संज्ञासूची छापणे
तुमच्या दस्तऐवजाच्या स्वरूपानुसार तुम्हाला संज्ञासूची छापण्याची आवश्यकता वाटू शकते. हे काहीसे संदर्भसूची छापण्यासारखेच आहे. ह्याकरिताही साहाय्यक धारिका निर्माण होतात. ह्या सर्व प्रक्रियेचे स्वयंचलन imakeidx
आज्ञासंचातर्फे होते. ह्याकरिता लाटेक्-ला तीन सूचना देण्याची गरज असते.
\makeindex
आज्ञा, हिच्यासह सूची तयार होते\index
आज्ञा, हिच्यामुळे नोंदी तयार करता येतात\printindex
आज्ञा, हिच्यामुळे सूची छापली जाते
\documentclass{article}\usepackage[T1]{fontenc}\usepackage{imakeidx}\makeindex\begin{document}Some text about Foo\index{foo}.More text\index{baz!bar}.Even more text\index{alpha@$\alpha$}.More text about a different part of baz\index{baz!wibble}.\clearpageSome text about Foo\index{foo} again, on a different page.Even more text\index{beta@$\beta$}.Even more text\index{gamma@$\gamma$}.\printindex\end{document}
इथे आपण सूचीची दोन वैशिष्ट्ये पाहिली आहेत. !
ह्या चिन्हासह उपविभाग तयार करणे. तसेच अनुक्रमित सूचीतील मजकुरापेक्षा काही वेगळे लिहिण्यासाठी @
ह्या चिन्हाचा वापर. ह्यात आणखी बरेच बदल करता येऊ शकतात. उदाहरणे चालवून पाहा.