प्रकरण १०

amsmathमधील मांडणीची क्षेत्रे

मुख्य प्रकरणात दाखवलेल्या align* क्षेत्राखेरीज, amsmath आज्ञासंचात अनेक क्षेत्रे उपलब्ध आहेत. gather हे क्षेत्र अनेक ओळींतील गणिती मांडणीसाठी उपयुक्त आहे, परंतु त्यांमध्ये कोणतीही आडवी मांडणी दिसत नाही. multline क्षेत्रासह एक मोठे समीकरण अनेक ओळींवर लिहिता येते. त्यातील पहिली ओळ डावीकडे मांडली जाते तर शेवटची ओळ उजवीकडे. प्रत्येक क्षेत्राच्या नावापुढे * जोडल्यास त्या क्षेत्रातील समीकरणांना क्रमांक मिळत नाहीत.

\documentclass[a4paper]{article}
\usepackage[T1]{fontenc}

\usepackage{amsmath}

\begin{document}

Gather
\begin{gather}
  P(x)=ax^{5}+bx^{4}+cx^{3}+dx^{2}+ex +f\\
  x^2+x=10
\end{gather}

Multline
\begin{multline*}
   (a+b+c+d)x^{5}+(b+c+d+e)x^{4} \\
    +(c+d+e+f)x^{3}+(d+e+f+a)x^{2}+(e+f+a+b)x\\
    + (f+a+b+c)
\end{multline*}
\end{document}

गणिती अक्षरजुळणीत स्तंभ

amsmath आज्ञासंचातील मांडणीची क्षेत्रे समीकरणांची स्तंभयुक्त मांडणी करू शकतात. प्रत्येक जोडीतील पहिला स्तंभ उजवीकडे मांडला असतो व दुसरा स्तंभ डावीकडेे.

\documentclass{article}
\usepackage[T1]{fontenc}
\usepackage{amsmath}
\begin{document}
Aligned equations
\begin{align*}
a &= b+1   &  c &= d+2  &  e &= f+3   \\
r &= s^{2} &  t &=u^{3} &  v &= w^{4}
\end{align*}

\end{document}

मांडणीच्या ह्या क्षेत्रांच्या ed प्रत्ययासहितच्या आवृत्त्यादेखील उपलब्ध आहेत. ह्या क्षेत्रांमधील मजकूर एक समीकरण असल्याप्रमाणे छापला जातो व त्यामुळे समीकरणावर व खाली सोडलेल्या जागेत फरक पडतो. ह्या क्षेत्रांची नावे alignedgathered अशी आहेत.

\documentclass{article}
\usepackage[T1]{fontenc}
\usepackage{amsmath}
\begin{document}
Aligned:
\[
\left.\begin{aligned}
a&=b\\
c&=d
\end{aligned}\right\}
\Longrightarrow
\left\{\begin{aligned}
b&=a\\
d&=c
\end{aligned}\right.
\]
\end{document}

aligned ह्या क्षेत्रास स्थानाचा वैकल्पिक कार्यघटक देता येतो. ह्यामुळे शीर्षस्थानी दर्शनी गणित बसवणे शक्य होते. पुढील उदाहरण पाहा.

\documentclass{article}
\usepackage[T1]{fontenc}
\usepackage{amsmath}
\begin{document}
\begin{itemize}
\item 
$\begin{aligned}[t]
a&=b\\
c&=d
\end{aligned}$
\item 
$\begin{aligned}
a&=b\\
c&=d
\end{aligned}$
\end{itemize}
\end{document}

ठळक ठशातील गणित

लाटेक्-सह दोन पद्धतींनी ठळक ठशातील गणिती चिन्हे मिळवता येतात. संपूर्ण पदावली जर ठळक ठशात हवी असेल, तर \boldmath ही आज्ञा पदावलीपूर्वी लिहावी. पदावलीतील काही ठरावीक चिन्हे ठळक करण्यासाठी \mathbf ही आज्ञाही उपलब्ध आहे.

\documentclass[a4paper]{article}
\usepackage[T1]{fontenc}

\begin{document}


$(x+y)(x-y)=x^{2}-y^{2}$

{\boldmath $(x+y)(x-y)=x^{2}-y^{2}$ $\pi r^2$}

$(x+\mathbf{y})(x-\mathbf{y})=x^{2}-{\mathbf{y}}^{2}$
$\mathbf{\pi} r^2$ % bad use of \mathbf
\end{document}

गणितक्षेत्राच्या इटालीय वळणातच ठळक ठसा हवा असेल, तर bm आज्ञासंचातील \bm ही आज्ञा वापरू शकता. ही आज्ञा = अशा चिन्हांवर अथवा ग्रीक अक्षरांवरही काम करते. वरील उदाहरणात असे लक्षात येईल की \pi ह्या आज्ञेवर ठळक ठशाच्या आज्ञेचा कोणताही परिणाम झाला नाही.

\documentclass[a4paper]{article}
\usepackage[T1]{fontenc}
\usepackage{bm}

\begin{document}

$(x+\mathbf{y})(x-\mathbf{y})=x^{2}-{\mathbf{y}}^{2}$

$(x+\bm{y})(x-\bm{y}) \bm{=} x^{2}-{\bm{y}}^{2}$

$\alpha + \bm{\alpha} < \beta + \bm{\beta}$

\end{document}

mathtools आज्ञासंच

mathtools आज्ञासंचातर्फे amsmath हा आज्ञासंच वापरला जातो व त्या आज्ञासंचात काही अतिरिक्त सुविधा पुरवल्या जातात. उदा. amsmath आज्ञासंचाहून किंचित वेगळ्या सारण्या ज्यांमध्ये आडवी मांडणी शक्य आहे.

\documentclass[a4paper]{article}
\usepackage[T1]{fontenc}
\usepackage{mathtools}

\begin{document}

\[
\begin{pmatrix*}[r]
  10&11\\
   1&2\\
  -5&-6
\end{pmatrix*}
\]

\end{document}

युनिकोड व गणित

प्रकरण १४मध्ये आपण हे पाहूच की काही लाटेक्-चालक ओपनटाईप टंक वापरू शकतात. ह्या चालकांद्वारेदेखील टेक्-चे मूळ गणिती टंकच वापरले जातात, परंतु unicode-math हा आज्ञासंच वापरल्यास मात्र ओपनटाईप गणिती टंक वापरणे शक्य आहे. ह्या आज्ञासंचाचे तपशील ह्या अभ्यासक्रमाचा मूळ भाग नाहीत, त्यामुळे आज्ञासंचाची हस्तपुस्तिका वाचावी असे आम्ही सुचवू. आज्ञासंचाचे एक लहान उदाहरण पुढीलप्रमाणे.

% !TEX lualatex
\documentclass[a4paper]{article}
\usepackage{unicode-math}
\setmainfont{TeX Gyre Pagella}
\setmathfont{TeX Gyre Pagella Math}

\begin{document}

One two three
\[
\log \alpha + \log \beta = \log(\alpha\beta)
\]

Unicode Math Alphanumerics
\[A + \symfrak{A}+\symbf{A}+ \symcal{A} + \symscr{A}+ \symbb{A}\]

\end{document}